1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified बुधवार, 30 नोव्हेंबर 2022 (15:17 IST)

नाशिकमध्ये मृत महिलेच्या बँक खात्यातून “इतके” हजार रुपये काढून फसवणूक

fraud
नाशिक : मृत महिलेच्या पोस्टात व बँकेत असलेल्या खात्यातून परस्पर 50 हजार रुपये काढून फसवणूक करणार्‍या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी सुनील गणेश बेंडकोळी ऊर्फ धोंडेगावकर (रा. आदिवासी सोसायटी, सैलानी बाबा स्टॉपजवळ, जेलरोड) यांच्या आई हिराबाई गणेश बेंडकोळी या मयत झाल्या आहेत. दि. 14 ऑक्टोबर 2021 रोजी आरोपी कैलास बाबूराव बेंडकोळी (वय 50, रा. धोंडेगाव, ता. जि. नाशिक), लता लक्ष्मण फसाळे (रा. रामवाडी, पंचवटी, नाशिक), सविता सुनील रुईकर (रा. गायत्री अपार्टमेंट, इंद्रकुंड, पंचवटी), संगीता रामदास मांडवे (रा. सातपूर, नाशिक) व इंदिरा दिनेश जामधरे (रा. मुंबई) यांच्यासोबत फिर्यादी सुनील बेंडकोळी यांची घरगुती चर्चा सुरू असताना आरोपींनी त्यांच्याशी क्षुल्‍लक कारणावरून वाद घातले.
 
हा वाद सुरू असताना बेंडकोळी यांना समजले, की कैलास बेंडकोळी यांच्या सांगण्यावरून सर्व आरोपींनी बेंडकोळी यांच्या आईच्या पोस्ट व बँक खात्यातून परस्पर 50 हजार रुपये काढून घेतले. याबाबत आरोपींना विचारणा केली असता फिर्यादी बेंडकोळी यांना राहत्या फ्लॅटमधून बाहेर काढण्याची धमकी दिली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे करीत आहेत.

Edited By- Ratnadeep Ranshoor