सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 22 सप्टेंबर 2023 (15:33 IST)

लालबागच्या राजाच्या मंडपात फ्री स्टाईल हाणामारी

lalbaghcha raja
सध्या देशात आणि राज्यात गणेशोत्सवाची धूम आहे. मंदिर पंडाल गणेश भक्तांनी गजबजले आहे. मुंबईच्या लालबागच्या राजाला देखील भाविकांची प्रचंड गर्दी आहे.

लालबागच्या राजाचे दर्शनासाठी भाविक तासन्तास रांगेत उभे राहतात. या वर्षी देखील भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रांगेत उभे असताना या ठिकाणी व्यवस्थापक आणि भाविकांमध्ये हाणामारी झाली आहे. या हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

व्हायरल व्हिडीओ मध्ये मंडळाचे पदाधिकारी भाविकांना मारहाण करताना दिसत आहे. मंडपात मोठ्या प्रमाणत गोंधळ झालेला दिसत आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी संताप व्यक्त करत आहे.  

लालबागच्या राजाच्या मंडपात दरवर्षी असे प्रकार घडत असतात. दोन दिवसांपूर्वी लालबागच्या राजाच्या मंडपातील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओ मध्ये रांगेत उभे असलेल्या भाविकांमध्ये चेंगराचेंगरी  झालेली दिसली. दरवर्षी प्रमाणे मंडळाचे व्यवस्थापन कुचकामी ठरताना दिसत आहे

Edited by - Priya Dixit