रविवार, 10 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 30 जुलै 2024 (10:37 IST)

गुजरात ते महाराष्ट्रापर्यंत, येत्या 24 तासात या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, रेड अलर्ट घोषित

monsoon update
हवामान विभागाने परत रेड अलर्ट घोषित केला आहे. येत्या दोन दिवसांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शकयता वर्तवण्यात आली आहे. तर, उत्तर पश्चिम राज्यामध्ये मान्सून सक्रिय असणार आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार 30 जुलै पासून अधिकांश राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आईएमडी ने पूर्व राजस्थान, मध्य महाराष्ट्र, कोंकण, गोवा करिता ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे. तर गुजरात, सौराष्ट्र आणि कच्छसाठी रेड अलर्ट घोषित केला आहे. 
 
29 जुलै ते 1 ऑगस्टपर्यंत या राज्यांमध्ये मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात मुसळधार पाऊस पडेल. 29 जुलै आणि 1 ऑगस्ट रोजी विदर्भ आणि मध्य प्रदेशात तुरळक ठिकाणी, 30 जुलै ते 31 जुलैपर्यंत गुजरात प्रदेश आणि 30 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत छत्तीसगडमध्ये मुसळधार पाऊस पडेल.
 
मध्य महाराष्ट्र, कोंकण आणि गोवामध्ये 29 जुलै ते 31 जुलै पर्यंत पाऊस कोसळणार आहे. उत्तराखंड मध्ये 31 जुलै आणि १ ऑगस्टला मुसळधार पाऊस कोसळेल.