सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 ऑगस्ट 2023 (14:27 IST)

गड चिरोली : प्रवाशांचा जीव मुठीत घेत हातात छत्री धरून ड्रायव्हर चालवतोय बस

social media
सध्या राज्यात पावसाने झोडपले आहे. राज्यातील अनेक भाग पावसाच्या पाण्याच्या खाली गेले आहे. काही ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे एसटी बसच्या छताला देखील गळती लागली आहे. अशा परिस्थितीत या एसटीच्या बस चालकाला चक्क छत्री हातात घेऊन बस चालवावी लागत आहे. हे चित्र आहे गडचिरोलीच्या अहेरी आगारातील व्हिडओ समोर आला आहे. 

एसटी बसच्या गळतीमुळे ड्रायव्हरला मोठ्या संकटांना तोंड देत बस चालवावी लागत असून पाऊस सुरू असताना बसमध्ये छत गळत होती अशा परिस्थितीत बस चालक चक्क बस मध्ये छत्री घेऊन बस चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या धक्कादायक प्रकाराचे व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

या व्हिडिओमध्ये बस चालक ज्या पद्धतीने बसचे स्टिअरिंग सांभाळत बस चालवत आहे हे पाहून अंगाचा थरकाप उडतो. अशा प्रवासामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लावून बस चालकाला बस चालवावी लागत आहे. एसटी बसची अशी दुर्व्यवस्था पाहून गडचिरोलीतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे प्रश्न ऐरणीला आले असून एसटीचा भोंगळ कारभार दिसून आला आहे. राज्य सरकार या कडे लक्ष देत नसल्याचे चित्र देखील दिसून आले आहे. 
 
 
Edited by - Priya Dixit