गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021 (20:51 IST)

पाकिस्तानमधून परत आलेल्या हसीना बेगम यांचं निधन

पाकिस्तानमध्ये तब्बल १८ वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर २६ जानेवारीला भारतात परतलेल्या ६५ वर्षीय हसीना बेगम  यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. त्या औरंगाबादच्या रशदपुरा येथील रहीवासी होत्या. त्यांची नमाजे जनजा रशीदपुरा येथील मोहंमदीया मस्जिद मध्ये नमाज जोहरमध्ये अदा करण्यात आली. मायदेशी परतल्यानंतर अवघ्या १५ दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला आहे. मायभूमीत अखेरचा श्वास घेवून त्यांनी जगातून निरोप घेतला. औरंगाबाद येथील पीरगैब कब्रस्तान येथे त्यांचा दफनविधी करण्यात आला. त्यांना वारस नसल्याने नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी दफनविधी केले. 
 
पतीच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी औरंगाबादमधील हसीना बेगम १८ वर्षांपूर्वी पाकिस्तानामध्ये गेल्या होत्या. या दरम्यान त्यांचा पासपोर्ट हरवल्याने त्यांना तब्बल १८ वर्ष पाकिस्तानच्या जेलमध्ये काढावे लागले.