शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 मार्च 2023 (08:20 IST)

शरद पवार यांचा दाढी असणारा फोटो तुम्ही कधी पाहिला आहे का?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा दाढी असणारा फोटो तुम्ही कधी पाहिला आहे का? नाही! तर वर कव्हरवर लावलेला फोटो पाहा. त्यात शरद पवार दाढी राखलेले त्यातही फ्रेंच कटमध्ये दिसून येत आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा फोटो शेअर केला आहे. त्यावर नेटकऱ्यांत खुमासदार चर्चा रंगली आहे.
शरद पवार यांची राजकीय कारकिर्द असंख्य प्रकारच्या घडामोडींनी रंगलेली आहे. पवार आपल्या हटके राजकीय भूमिकांमुळे नेहमीच चर्चेत राहतात. त्यावरुन अनेकदा त्यांना रोषालाही सामोरे जावे लागते. पण त्यांची राजकीय हुशारी व अनुभव हा सर्वपक्षीयांच्या चर्चेचा विषय ठरतो. अशीच चर्चा आता त्यांच्या एका फोटोवरून रंगली आहे.
 
सुप्रिया सुळेंची पोस्ट अन् चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आपले वडील शरद पवार यांच्यविषयी नेहमीच आपल्या भावना व्यक्त करतात. त्या सोशल मीडियावर तशा पोस्टही करतात. त्यांनी बुधवारी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शरद पवारांचा एक फोटो शेअर केला. त्यात शरद पवार आपल्या पत्नी प्रतिभा यांच्यासोबत बसल्याचे दिसून येत आहेत. हा कृष्णधवल अर्थात ब्लॅक अँड व्हाइट फोटो 40-45 वर्षांपूर्वीचा असल्याचे सांगितले जात आहे.
 
Edited By - Ratnadeep ranshoor