शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 सप्टेंबर 2021 (08:07 IST)

चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस, पूरबाधित गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

राज्यात काही दिवस काही भागात तुरळक तर काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. चिपळूण तालुक्यात दुपारपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस सुरुच असल्यामुळे पूरबाधित गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहेत. आवश्यक काम असल्यास घराबाहेर पडा अन्यथा पडू नका अशा सूचना देखील नागरिकांना देण्यात आल्या आहेत. मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु असला तरी वशिष्ठी नदीतील पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली नसल्यामुळे प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. .
 
चिपळूणमधील सुरु असेलल्या पावसामुळे तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी सर्व गावांना आणि नगरपालिका, पूरबाधित ग्रामपंचायतींना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. २४ तास सतत पाऊस पडल्यानंतर चिपळूणमध्ये पुन्हा पूरस्थिती निर्माण होऊ शकते. नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासनाकडून नगरपालिकेचे कर्मचारी अनेक भागांच्या गस्तीसाठी नेमण्यात आले आहेत. मुसळधार पावसामुळे शहरात धोकादायक घटना घडू नये यासाठी अधिक काळजी घेतली जात आहे.