1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified सोमवार, 23 जानेवारी 2023 (15:15 IST)

अघोरी कृत्य! विवाहितेला खाऊ घातली मानावी हाडांची राख; कारण हादरवून टाकणारे

rape
विद्येचे माहेरघर म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या पुण्यामध्ये अघोरी कृत्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये विवाहितेला स्मशानातील राख आणि हाडांचा चुरा जबरदस्तीने खावू घातल्याचे उघड झाले आहे. पुणे शहरामधील धायरी भागात हा प्रकार २०१९ पासून सुरू होता. पीडित महिलेने सिंहगड रोड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.
 
पत्नीला आरोपी पती तसेच घरातील इतर जणांनी संगनमत करून शारीरिक आणि मानसिक छळ करून वारंवार मारहाण करून शिवीगाळ केल्याचा हा प्रकार पुणे शहरातील धायरी भागात २०१९ पासून सुरू होता. पीडित महिलेने सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला लग्न झाल्यापासून पतीसह घरच्यांनी अनेक वेळा पैशांची मागणी केली होती.
 
एका अमावस्येच्या दिवशी रात्री सर्वजण जवळच्या स्मशानभूमीमध्ये गेले. तिथे जळालेल्या मृतदेहाची काही हाडे गोळा केली आणि राख मडक्यात घेतली. ते सर्व घरी आणून त्याची पूजा करण्यात आली. मडक्यामधील राख पाण्यामध्ये टाकून ते पाणी फिर्यादीला पिण्यासाठी दिले. यानंतर फेबुवारी २०२१ मध्ये जावेच्या निगडी येथील घरी पूजा करण्यात आली. त्यासाठी मृत माणसाचे हाडे, केस, घुबडाचे पाय आणि कोंबडीचे धड हे सर्व जावेच्या आईवडिलांनी आणून ठेवले होते. मांत्रिक महिलेने अघोरी पूजा केली. त्यानंतर डोक्याला पिस्तूल लावून हाडाची पावडर करून ती फिर्यादीला खायला सांगितली.
 
याबरोबरच सासरचे लोक महिलेला लग्नामध्ये मिळालेले दागिने आणण्यासाठी अनेक वेळा मागणी करून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करायचे. घरामध्ये भरभराट व्हावी तसेच महिलेला मुलगा व्हावा यासाठी पतीसह सासू-सासरे, दीर आणि जावेने मिळून अघोरी आणि जादूटोणा करून पूजादेखील घातली होती. सासरच्या जाचाला कंटाळून अखेर या महिलेने पोलिसांत धाव घेतली.
 
पती जयेश पोकळे, दीर श्रेयस पोकळे, ईशा पोकळे, सासरे कृष्णा पोकळे, सासू प्रभावती पोकळे, दीपक जाधव आणि बबिता जाधव अशी आरोपींची नावे आहेत. या सर्वांवर सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By- Ratnadeep Ranshoor