गुंडगिरी कशी वाढली? गुंड मुन्ना यादव हा कोणाचा कार्यकर्ता
नागपूर शहरात मोठ्या प्रमाणावर गुंडगिरी वाढली होती. तसेच मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे वाढले होते. ज्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पाच वर्षे मुख्यमंत्री होते. त्यावेळी गृहमंत्री पद देखील त्यांच्याकडेच होते. त्यावेळी हत्येच्या घटना सुद्धा घडल्या.नागपूरसह राज्यात कशी काय गुंडगिरी वाढली? तसेच नागपूर शहरातील नंबर एकचा गुंड मुन्ना यादव हा कोणाचा कार्यकर्ता आहे? याचे उत्तर देवेंद्र फडणवीसांनी द्यावे? असा सणसणीत सवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.
दरम्यान, राज्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत चालली असल्याचा आरोप फडणवीसांनी केला होता. त्यालाच गृहमंत्र्यांनी अमरावतीत प्रत्युत्तर दिले. यावेळी ते म्हणाले, राज्यातील गुन्हेगारीवर पोलिस खात्याकडून १०० टक्के कारवाई केली जात आहे, तर पोलिसांवर हल्ला करणाऱ्याची कुठल्याही परिस्थिती गय केली जाणार नाही.