सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 2 जानेवारी 2022 (10:40 IST)

कोरोनाच्या धोक्यात शिवसेनेच्या जत्रोत्सवात प्रचंड गर्दी, कारवाई करण्याची भाजपची मागणी

कोरोनाची रुग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढत असताना नागरिकांडून मात्र नियमांची ऐशी-तैशी केली जात असल्याचं पाहायला मिळतंय. त्यात अंधेरीतल्या एका कार्यक्रमामुळं शिवसेनेलाच मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाचा विसर पडला का? असा सवाल केला जात आहे.
अंधेरीमध्ये शिवसेनेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या मालवणी जत्रोत्सवाला प्रचंड गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. गर्दीचे नियम मोडत कोरोना नियमांची पायमल्ली याठिकाणी होत असल्याचं सांगितलं जात आहे.
अंधेरी पोलीस स्टेशन समोरच हा जत्रोत्सव होत आहे. महापौर मॉलसारख्या ठिकाणी पाहणी दौरे करतात मग अशा कार्यक्रमांना परवानगी कशी मिळते, हा देखील मुद्दा उपस्थित होत आहे.
या प्रकरणी आयोजकांवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी भाजपच्या नेत्यांनी केली आहे. मुंबईतील रुग्णसंख्या ही झपाट्यानं वाढत असताना अशा कार्यक्रमांवरून आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.