सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मी भाजपा सोडणार नाही - एकनाथ खडसे

भाजपातील जेष्ठ नेते एकनाथ खडसे सध्या चर्चेत आहेत. त्यांच्या वक्तव्या नुसार ते पक्ष सोडतील असे चित्र निर्माण झाले होते. तर असे झाले तर भाजपाला मोठा धक्का बसणार होता,  भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे भाजप सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश करणार अशी जोरदार  चर्चा होती. त्यात खडसे यांनी  कुठल्याही नेत्यावर एकाच पक्षाचा शिक्का असू शकत नाही, असे वक्तव्य  एका कार्यक्रमात केले होते. त्यामुळे खडसे भाजपला रामराम ठोकतील, अशी शक्यता वर्तवली होती. 
 
 ते भाजप सोडणार सोडणार नाहीत, असा खुलासा खुद्द खडसे यांनी केला आहे. त्याचबरोबर आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला, असे देखील ते म्हणाले आहेत. चाळीस वर्ष काम करत असून माझा पक्ष सोडून मी जाणार नसून अनेक पक्ष मला बोलावत आहेत, मात्र मी पक्ष सोडणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. लोकसभा  २०१४ च्या निवडणुकीत जिंकूण आल्यानंतर भाजपकडून खडसेंवर गृहमंत्री पदाची धूरा सांभाळण्याची जबाबदारी होती. समाजसेविका अंजली दमानिया यांनी खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्याचबरोबर या कालावधीत खडसेंवर विरोधी पक्ष आणि इतर लोकांकडून बरोच आरोप-प्रत्यारोप केले होते. मग पक्षाने त्यांच्याजवळील मंत्रीपद काढून घेतले. पुण्याच्या जमिन भूसंपादन प्रकरणी खडसे यांना क्लीन चीट मिळाली होती. परंतु, क्लीन चीट मिळून देखील त्यांना पक्षाकडून मंत्रीपद दिले गेले नाही. यामुळे खडसे बऱ्याच दिवसांपासून नाराज आहेत.