शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 2 नोव्हेंबर 2022 (21:25 IST)

तू आधी कुंकू किंवा टिकली लाव, तरच तुझ्याशी बोलेन-संभाजी भिडे

sambhaji bhide
संभाजी भिडे हे वादग्रस्त विधानामुळे कायम चर्चेत असतात.आज पुन्हा त्यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. संभाजी भिडे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली. यावेळी महिला पत्रकारने विचारलेल्या प्रश्नावर बोलताना त्यांनी ”तू आधी कुंकू लाव, मग मी तुझ्याशी बोलतो” असे वादग्रस्त विधान केले आहे.

नेमकं काय घडलं?
संभाजी भिडे आज मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, एका महिला पत्रकाराने त्यांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारला असता, “तू आधी कुंकू किंवा टिकली लाव, तरच तुझ्याशी बोलेन. प्रत्येक स्त्री ही भारत मातेचं रुप आहे. भारत माता विधवा नाही”, असे वादग्रस्त विधान केले.

भिंडेंच्या वक्तव्याची राज्य महिला आयोगाच्याकडून दखल
संभाजी भिडे यांच्या वक्तव्याची राज्य महिला आयोगाकडूनही दखल घेण्यात आली. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर याबाबत बोलताना म्हणाल्या.

Edited By- Ratnadeep Ranshoor