गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक
बांदा गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोवर बांदा येथे कारवाई केली या कारवाईत विविध ब्रॅन्डच्या 750 मिलीच्या एकूण1200 सिलबंद काचेच्या बाटल्या, 180 मिलीच्या एकूण 21936 सिलबंद काचेच्या बाटल्या व बिअर 500 मिली क्षमतेच्या 1032 सिलबंद टिन तसेच आयशर टेंम्पो वाहनासह एकूण 600 बॉक्स मिळून आले. एकूण मुद्देमाल रू. 55,42,080/- चा जप्त करण्यात आला याप्रकरणी संजय मारूती गवस वय वर्ष 42 रा. मधलीवाडी वाफोली, यास अटक करण्यात आले आहे.
सदरची कारवाई निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर या पथकाने मा. विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर श्री. बी. एच.तडवी, यांचे आदेशाने निरीक्षक . एस. जे. डेरे, दुय्यम निरीक्षक . आर. जी. येवलुजे, दुय्यम निरीक्षक . एस. एस. गोंदकर व कॉन्स्टेबल सर्वश्री सुशांत बनसोडे, विलास पवार, अमोल यादव, दिपक कापसे यांनी केली.