मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 17 फेब्रुवारी 2021 (22:32 IST)

बुलढाणा जिल्ह्यात तात्काळ संचार बंदीचे आदेश लागू

बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल 199 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाने याबाबत गंभीर होत तात्काळ संचार बंदीचे आदेश लागू केले आहेत. या संदर्भात जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी हे आदेश काढले असून जिल्ह्यात आता एकप्रकारे लॉकडाऊनसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.  दुसरीकडे आदेश निघाल्या निघाल्या तात्काळ पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे.
 
राज्यात काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. काही शहरात ही वाढ गंभीर होत चालली आहे. त्यामुळे पुन्हा कडक निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला आहे.