बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 16 जानेवारी 2022 (15:07 IST)

तीन महिन्यात दाम दुप्पट करण्याचे आमिष दाखवत, बार्शीकरांना 200 कोटींचा गंडा

तीन महिन्यात तुमचे पैसे दुप्पट करून देतो असे आमिष दाखवून कोटी रुपयांचा गंडा घटना उघडकीस आली आहे. दाम दुप्पट करण्याचे सांगून बार्शीकरांची  फसगत  ' स्कॅम विशाल ' मध्ये झाली असल्याचे वृत्त आहे. 'स्कॅम विशाल ' हे विशाल फटे याचे असल्याचे उघडकीस आले. या मध्ये दाम दुप्पट करण्याच्या आमिषाला बार्शीतील काही पोलीस, डॉक्टर, पत्रकार, राजकीय नेते देखील फसले आहे. आरोपी विशाल हा पसार झाला असून त्याच्या वडील आणि भावाला अटक करण्यात आली आहे. 
बार्शीत शेअर बाजारात पैसे गुंतवा पैसे तीन महिन्यात दुप्पट करून मिळतील .असे विशाल ने सर्वाना आमिष दाखवले. त्याच्या बोलण्यात काही बडे अधिकारी ,व्यापारी, नेते, पोलीस डॉक्टर अडकले आणि त्यांनी आपले पैसे गुंतवले. या प्रकरणात आपली फसवणूक झाली आहे. असे उघडकीस आले. बार्शीकरांना तब्बल 200 कोटींचा गंडा लावून आरोपी विशाल आपल्या पत्नी राधिका आणि दीड वर्षाच्या मुलीसह पसार झाला असून त्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या स्कॅम मध्ये 60 पेक्षा अधिक तक्रारी आल्या आहेत. विशालच्या शोधात पोलिसांची पथके लागली आहेत. आणि त्याचा शोध घेत आहे.