शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 16 जानेवारी 2022 (12:03 IST)

अ‍ॅप डाउनलोड करताच बॅंकेचं खातं झालं रिकामं

सध्या सायबर फ्रॉड चे प्रकरण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सायबर फ्रॉड मुळे सर्व सामान्य लोकांना आर्थिक फटका बसला आहे. सायबर चोरटे आर्थिक फसवणूक करण्याचे नवीन प्रकार अवलंबवत आहे. अशीच एक घटना पैठण तालुक्यात चणकवाडी येथे घडली आहे. येथे सायबर फ्रॉडमुळे एका सेवानिवृत्त फौजदाराला 10 लाखाचा फटका बसला आहे. तुकाराम मोहिते(63) असे फसवणूक झालेल्या फिर्यादीचे नाव आहे. तुकाराम यांचे एसबीआय मध्ये खाते आहे. त्यांना एसबीआयचे ऑनलाईन अ‍ॅप डाउनलोड करायचे होते. त्यांनी गुगलवर एसबीआयच्या बँकेचा हेल्पलाईन नंबर शोधत असताना. त्यांना आरोपीचा नंबर कस्टमर केअर म्हणून मिळाला . त्यांनी आरोपीचा नंबर वर फोन केल्यावर आरोपीने त्यांना एसबीआयचा अधिकारी असल्याचे सांगितले आणि मी सांगीन तसे करा असे म्हटले. नंतर आरोपीने तुकाराम यांना एनी डेस्क हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले आणि त्यावर त्यांच्याकडून आलेलं ओटीपी सांगण्यास सांगितले. तुकाराम यांनी ओटीपी सांगताच त्यांच्या खात्यातून काहीच सेकंदात 10 लाख 24 हजार रुपये काढण्यात आल्याचे समजले. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे तुकाराम यांना समजतातच त्यांनी त्वरितच पोलिसांकडे धाव घेतली आणि घडलेलं सर्व सांगितले. पोलिसांनी आर्थिक फसवणुकीसह अन्य कलमांतर्गत अज्ञात सायबर चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या आरोपीचा शोध तांत्रिक माहितीच्या आधारे घेतला जात आहे. घटनेचा तपास पोलीस करत आहे.