1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified सोमवार, 18 ऑक्टोबर 2021 (10:24 IST)

वाद केल्यामुळे रागाच्या भरात, पतीने पत्नीची हत्या करून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली

वाद कोणाचे होत नाही पती पत्नी मध्ये वाद होणं देखील साहजिक आहे. पण वाद विकोपाला जाऊ नये ह्याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. अन्यथा त्याचे परिणाम भयंकर होऊ शकतात.असेच काही घडले आहे दौलताबाद येथील तालुका गंगापूर टाकळीवाडी येथे. पती पत्नी मध्ये वाद झाला आणि हा वाद विकोपाला गेला आणि रागाच्या भरात येऊन पती ने पत्नीचा कुऱ्हाड मारून खून करून स्वतः विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाची नोंद दौलताबाद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
चंपालाल तानसिंग बिघोत(55), गंगाबाई चंपालाल बिघोत(48) असे मयत झालेल्या दाम्पत्यांची नावे आहेत.
 
काय आहे संपूर्ण प्रकरण 
चंपालाल आणि त्यांची पत्नी गंगाबाई शनिवारी दररोज प्रमाणे जेवण आटपून शेतात असलेल्या घराच्या ओट्यावर निजले असताना त्यांचामध्ये कोणत्या तरी कारणावरून वाद झाले आणि ते वाद विकोपाला गेले. रागाच्या भरात येऊन चंपालाल यांनी गंगाबाईच्या डोक्यात कुऱ्हाडने वार करून खून केला. त्यांची मुलगा घरातच झोपला होता. आईच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आत निजलेल्या मुलाने राहुल ने बाहेर येण्याचा प्रयत्न केला पण दाराला बाहेरून कडी लागलेली असल्याने त्याला बाहेर येता आले नाही. तो मागील दाराने बाहेर येऊन त्यांनी आपल्या आईला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पहिले. त्याने नातेवाईकांच्या मदतीने आईला रुग्णालयात दाखल केले असताच गंगाबाई यांचा मृत्यू झाला. दरम्यान चंपालाल यांनी देखील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
 
घटनेची माहिती मिळतातच दौलताबाद पोलिसांनी धाव घेत अग्निशमन दलाला कळविण्यात आले आणि अग्निशमन दलाचे अधिकाऱ्यांनी घटनासाठी जाऊन  मयत चंपालाल चे मृतदेह विहिरीतून काढून शवविच्छेदनास पाठवण्यात आले. पोलीस आणि फॉरेन्सिक अधिकारी आणि ठसे तज्ज्ञ यांनीघटनास्थळ वरून गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड आणि रक्ताने माखलेले कपडे जप्त केले. पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली आहे.