सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 16 जुलै 2023 (17:36 IST)

फोटो काढण्याच्या नादात मुलीच्या डोळ्या देखत महिला समुद्रात वाहून गेली

असे म्हणतात की आग, हवा आणि पाण्याशी कधीही खेळू नये कारण ते प्राणघातक ठरू शकते. कधी व्हिडीओमुळे तर कधी फोनवरून घेतलेल्या सेल्फीमुळे अनेकदा लोकांना जीवगमवावा लागला आहे. नुकताच व्हायरल झालेला एक भयावह व्हिडीओ  व्हायरल होत आहे. मुंबईतील वांद्रे बॅण्डस्टॅण्डच्या समुद्रावरचा हा व्हिडीओ आहे.  एक जोडपे कुटुंबासोबत एन्जॉय करताना दिसत आहे, पण त्यानंतर जे घडते ते भीतीदायक आहे. आणि त्याच बरोबर कायमचे धडे देणार आहे. 
 
व्हिडीओमध्ये हे जोडपे एका दगडावर बसून समुद्राच्या लाटांचा आनंद घेत असल्याचे दिसत आहे आणि त्यांची चिमुरडी त्याचा व्हिडिओ बनवत आहे. व्हिडिओमध्ये मुलाचा आवाज स्पष्टपणे ऐकू येतो. समुद्राच्या लाटा वर येत आहेत आणि पती-पत्नी एकमेकांना धरून आहेत.मुलगी म्हणते परत ये. यानंतर एक जोरदार लाट येते आणि त्या महिलेला घेऊन जाते. मुलगा आणि वडील धक्का बसून पाहत राहतात. व्हिडिओमध्ये 'मम्मी-मम्मी...' अशी ओरडणाऱ्या मुलीचा थरकाप आणि घाबरलेला आवाज स्पष्टपणे ऐकू येत आहे.ज्योती सोनार असे या मयत महिलेचे नाव आहे.   
 
महिलेचा पती मुकेश हा गौतम नगर, रबाळे, मुंबई येथे राहणारा असून एका खासगी कंपनीत टेक्निशियन म्हणून काम करतो. तो म्हणाला, “मी तिला वाचवण्याचा सर्वतोपरी  प्रयत्न केला. जेव्हा चौथी लाट आम्हाला मागून धडकली तेव्हा माझा तोल गेला आणि आम्ही दोघेही घसरलो मी माझ्या बायकोची साडी पकडली तेव्हा एका माणसाने माझा पाय धरला,  पण ती वाचू शकली नाही. 
 
तो पुढे म्हणाला, “माझी पकड घट्ट असली तरी ती तिच्या साडीवरून घसरली आणि माझ्या डोळ्यासमोर समुद्रात ओढली गेली. माझी मुलं तिथे होती. त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला मात्र कोणीही काही करू शकले नाही. या घटनेतून ते कसे सावरतील हे मला माहीत नाही.”
 
सायंकाळी 5.12 वाजण्याच्या सुमारास ही घटना पाहिल्यानंतर आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांनी पोलिसांना माहिती दिली. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांसह पोलीस घटनास्थळी पोहोचले. मुंबई अग्निशमन दलाच्या शोध मोहिमेनंतर रविवारी रात्री उशिरा ज्योतीचा मृतदेह सापडला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले मात्र तेथे पोहोचता.तीला मृत घोषित करण्यात आले. 
 
रविवारी कुटुंबाने जुहू चौपाटीवर जाण्याचे ठरवले होते. मात्र, भरती-ओहोटीमुळे समुद्रकिनाऱ्यावर प्रवेशबंदी करण्यात आली आणि कुटुंबीयांनी भेलपुरी सेंटरमध्ये.रात्रीचे जेवण करून वांद्र्याच्या दिशेने निघाले. येथे फोटो काढत असताना हा धोकादायक अपघात झाला. 
 
Edited by - Priya Dixit