गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 4 एप्रिल 2019 (07:57 IST)

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या फीमध्ये वाढ

यंदाच्या शैक्षणिक वर्षात वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या फीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. राज्य शुल्क नियमन प्राधिकरणाने (एफआरए) यंदाची फीची माहिती सीईटी सेलला दिली आहे. 2019 -20 या शैक्षणिक वर्षाच्या पदव्युत्तर वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमासाठी अंतिम शुल्काची माहिती सीईटी कक्षाने संकेतस्थळावर दिली आहे.
 
खासगी संस्थांना 7 लाख रुपयांपर्यंत कमीत कमी फी निश्चित केली आहे. गतवर्षी शुल्क संरचनामध्ये एकरूपता आणण्यासाठी एफआरएने 2017-18 मध्ये विविध महाविद्यालयांसाठी 10-50 टक्के शुल्क कमी केले होते. यंदा मात्र 20 ते 25 टक्के वाढ झाली आहे.