बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 1 एप्रिल 2020 (07:31 IST)

जितेंद्र आव्हाड सोलापूरचे नवे पालकमंत्री

सोलापूरचे पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना पदमुक्त करण्यात आले असून त्यांच्या ऐवजी नवे पालकमंत्री म्हणून जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
 
तथापि, वळसे-पाटील यांनी कामगार व राज्य उत्पादन शुल्क ही दोन्ही महत्त्वाची खाती सांभाळत असताना कामाच्या वाढत्या व्यापामुळे सोलापूरच्या पालकमंत्रिपदावरून मुक्त करण्याची विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे केली होती. त्यानुसार त्यांना पदमुक्त करण्यात आले आहे. ही माहिती स्वतः वळसे-पाटील यांनी प्रसिद्धीसाठी पाठविलेल्या निवेदनातून दिली आहे. यापुढे सोलापूरचा पालकमंत्री म्हणून काम करणार नसलो तरी कामगारमंत्री या नात्याने सोलापूरकडे आपले सतत लक्ष राहील. सोलापुरात कामगारांची मोठ्या प्रमाणात आहे. त्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्राधान्याने लक्ष देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.