1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 18 सप्टेंबर 2021 (21:19 IST)

चित्रपटगृह न उघडल्याने कंगनाची महाराष्ट्र सरकारवर टीका

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतच्या प्रदर्शित झालेला सिनेमा थलाइवीसिनेमासाठी तामिळ आणि तेलुगु भाषेत थिएटर्स मिळाले परंतु हिंदी सिनेमासाठी अद्याप थिएटर्स उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे कंगनाने मुंबईत चित्रपटगृह न उघडल्याने महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
 
एका पोस्टमध्ये कंगनाने म्हटलंय की, महाराष्ट्र सरकार जोपर्यंत फिल्म इंडस्ट्रीमध्ये थिएटर कल्चर पूर्णपणे बंद होत नाही तोवर चित्रपट गृहांवर बंदी ठेवणार आहे असं तिने आरोप केला आहे.
 
याठिकाणी अनेक सिनेमा चित्रपटगृहांच्या प्रतिक्षेत आहेत. कुणालाही कलाकार, निर्माते, डिस्ट्रीब्यूटर्स आणि चित्रपटगृह मालकांची चिंता नाही. फिल्म इंडस्ट्रीबद्दल राज्य सरकार वेगळी वागणूक देत आहे. आता बॉलिवूडने मौन बाळगण्याचं धोरण अवलंबलेलं दिसतंय. कुणीही जगातील सर्वात बेस्ट सीएमला प्रश्न विचारु शकत नाही अशी वृत्ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचीआहे असा आरोपही कंगना राणौतनं केला आहे.