शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 11 एप्रिल 2022 (15:42 IST)

किरीट सोमय्या नॉट रिचेबल, संजय राऊत यांनी केला फरार झाल्याचा आरोप

भाजपचे नेते किरीट सोमय्या मुलासह फरार झाले आहेत. त्यांना पकडण्यासाठी लूक आऊट नोटीस काढा, अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या फरार असल्याचा दावा केला आहे. या संदर्भात संजय राऊत यांनी ट्वीट केले आहे. हे दोघे मेहुल चोकसी प्रमाणे पळून तर गेले नाहीत ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान लोकशाही न्यूजने सोमय्या यांच्यांशी संपर्क केला असता ते नॉट रिचेबल होते. त्यांचा फोन दुसऱ्या कोणाकडे होता. त्यांनीही फोन कट केला.
 
ट्वीटमध्ये काय आहे
किरीट सोमय्या मुलगा निलसह फरार झाले आहेत. न्याय यंत्रणेवर दबाव आणून सुटका करुन घेण्याच्या प्रयत्नात हे ठग आहेत. न्यायालयाची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी बनावट कागदपत्रे तयार केली तरी सत्याचाच विजय होईल असे संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. प्रश्न इतकाच आहे की, हे दोन ठग कोठे आहेत? मेहुल चोकसी प्रमाणे पळून तर गेले नाहीत ? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळं आता राऊतांच्या या वक्तव्यावर सोमय्या काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

भारताची विमानवाहू युद्धनौका 'INS विक्रांत' वर संग्रहालय करण्यासाठी किरीट सोमय्या यांनी निधी गोळा केला होता. मात्र, हा निधी सोमय्या यांनी व्यवसायासाठी वापरला, असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला असून या प्रकरणी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर मुंबईत गुन्हा दाखल झाला आहे.