शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शुक्रवार, 29 जानेवारी 2021 (07:42 IST)

विरोधीपक्षनेते पदावर फार दिवस नाही, पण राहू तितके दिवस संघर्ष करू : फडणवीस

विरोधी पक्षनेते हे पद मिरवण्यासाठी नसते, आपण लोकांसाठी आणि त्यांना उत्तरदायी असतो याची जाणिव ठेवून आपल्या कार्याचा अहवाल देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारा नेता म्हणून भाजपच्या परंपरेत दरेकर यांचा नेहमी उल्लेख होत राहील, असे गौरवोद्गार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काढले. विरोधीपक्षनेते पदावर फार दिवस नाही, पण राहू तितके दिवस संघर्ष करू, असे फडणवीस म्हणाले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या वर्षभराच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या लेखाजोखा या पुस्तकाचे प्रकाशन  माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. 
 
राज्याचे नेते ज्यावेळी घरात बसले होते आणि जनता कोरोनाच्या काळात संकटात होती त्यावेळी गावोगाव दरेकर फिरत होते आणि लोकांना दिलासा देत होते, तीच गोष्ट कोकणात वादळाचे संकट आले किंवा अवकाळी पावसाने जनता संकटात आली तेव्हा सर्वात पहिले दरेकर पोहोचले. शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी जे काही वक्तव्य केले ते आशीर्वाद म्हणून घेवून पुढे जावूया असे म्हणत फडणवीस म्हणाले की या पदावर फार दिवस राहावे लागणार नाही. मात्र, जितके दिवस आहोत तितके दिवस या पदाला न्याय देण्याची आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.