मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 15 मार्च 2022 (22:13 IST)

आगे आगे देखो होता हे क्या सोमय्या यांची प्रतिक्रिया

भाजप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची याचिका फेटाळल्याच्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. राज्य सरकारला एक प्रकारे पुन्हा इशारा सोमय्यांनी दिला आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. आता तर नवाब मलिकांविरोधात एनआयएची टेरर फंडींगमध्ये चौकशी अजून बाकी आहे. मला नाही वाटत अनिल देशमुख आणि नवाब मलिक अनेक महिने तरी तुरुंगातून बाहेर येतील. अजून संजय राऊत, अनिल परब, हसन मुश्रीफ, यशवंत जाधव यांच्यावरील कारवाईला गती आली आहे. आगे आगे देखो होता हे क्या असा इशारा भाजप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिला आहे.