सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 10 जुलै 2023 (21:37 IST)

लातूर जिल्ह्यात लम्पी प्रतिबंधात्मक मोहीम, अडीच लाखांपेक्षा अधिक लसीकरण

लातूर जिल्ह्यातील २ लाख ५७ हजार ५०८ गोवर्गीय पशुधनास लम्पी चर्मरोग प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी सन २०२२-२३ साठी २ लाख ७० हजार १५९ लस मात्रा उपलब्ध करून देण्यात आलेल्या असून पैकी २ लाख ५२ हजार ११६ लसीकरण करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन उपआयुक्त नानासाहेब कदम यांनी दिली. २०२३-२४ या वर्षात लम्पी चर्मरोग प्रतिबंधात्मक वार्षिक लसीकरणासाठी १ लाख ३ हजार लस मात्रा दि. २६ मे, २०२३ रोजी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
 
प्रत्येक तालुक्याच्या मागणीप्रमाणे तशा लस उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. लातूर जिल्ह्यामध्ये दि. ३१ मार्च, २०२३ अखेर ४१४ पशुधन मृत्युमुखी पडले आहे तर ३० जून, २०२३ अखेर एकूण ६३० पशुधन लम्पी रोगामुळे मृत पावले असून त्यापैकी ३६७ मृत पशुधनास रुपये ७६.३४ लक्ष नुकसानभरपाई देण्यात आली आहे. उर्वरित निकषात बसणा-या मृत पशुधनाच्या पशुपालकांस निधी प्राप्त होताच नुकसानभरपाई देण्यात येईल, असे डॉ. पडिले यांनी सांगितले.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor