नागपुरात मुख्यमंत्री फडणवीस यांचे नवे मंत्रिमंडळ तयार झाले आहे. नवीन कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी सोहळा रविवारी संपन्न झाला. एकूण 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर मंत्रीपद न मिळाल्याने नाराज झाले आणि रागाच्या भरात त्यांनी पक्षाचे उपनेते आणि विदर्भ प्रदेश समन्वयक पदाचा राजीनामा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार विदर्भ प्रदेश समन्वयक पदाचा राजीनामा दिला पण नरेंद्र भोंडेकर यांनी अजून आमदार पदाचा राजीनामा दिलेला नाही. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते.
09:36 AM, 16th Dec
आजपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू, महाराष्ट्र सरकार एकूण 20 विधेयक मांडणार
09:35 AM, 16th Dec
तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे वयाच्या 73 व्या वर्षी निधन