मंगळवार, 28 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified मंगळवार, 9 नोव्हेंबर 2021 (22:11 IST)

मुख्यमंत्री यांना पाठ आणि मान दुखीचा त्रास

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गेले काही दिवस पाठीचं आणि मान दुखीचा त्रास होत आहे. हा त्रास अधिक बळावू नये यासाठी रिलायंन्स रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना छोट्या शस्त्रक्रियेचा पर्याय सूचवला आहे. मात्र शस्रक्रिया करायची की नाही याचा निर्णय स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार आहेत. 
 
सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घरगुती उपचार सुरू आहेत. त्यांच्या तब्येतीत सुधारणा देखील आहे. मात्र पुन्हा एकदा मान आणि पाठ दुखीचा त्रास होऊ नये यासाठी डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा पर्यायी सल्ला दिला आहे. 
 
गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्र्यांना हा त्रास जाणवत असून त्यांनी भेटीगाठीही टाळल्या आहेत. काल पंढरपूरमधील पालखी मार्गाच्या चौपदरीकरणाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन हजेरी लावली होती. पण या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या मानेला पट्टा लावलेला दिसला. त्यामुळे अनेकांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.