गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 26 डिसेंबर 2021 (09:56 IST)

Maharashtra Earthquake:महाराष्ट्रात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर तीव्रता 3.9

रविवारी पहाटे 5.35 च्या सुमारास महाराष्ट्रातील नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 3.9 इतकी नोंदवण्यात आली. नाशिकपासून पश्चिमेला ८८ किमी अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
पहाटेच भूकंपाच्या धक्क्यांनंतर लोक घाबरून घरातून मोकळ्या जागेकडे धावताना दिसले.