सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 17 ऑगस्ट 2022 (11:29 IST)

Maharashtra Monsoon Assembly :महाराष्ट्र पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांची शिंदे सरकार कोसळण्याची घोषणाबाजी

mumbai vidhan parishad
आज पासून महाराष्ट्राचे पावसाळी अधिवेशन सामूहिक राष्ट्रगीताने सुरु झाले असून पाहिल्याची दिवशी विरोधक आक्रमक झाले असून त्यांनी शिंदे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. ओला दुष्काळ असल्याचं जाहीर करा अशी मागणी त्यांनी केली. तसेच हे गद्दार सरकार लवकरच कोसळणार हे ईडीचे सरकार आहे, हे बेकायदेशीर सरकार असल्याच्या घोषणाबाजी केली. 
 
विरोधी पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ही घोषणाबाजी सुरु आहे. यामध्ये आदित्य ठाकरे देखील सहभागी झाल्याचे दिसून येत आहे. याबद्दल ते म्हणाले, की  या सरकार मध्ये  ना महिलांना स्थान आहे, ना मुंबईकरांना स्थान आहे . तसेच अपक्षांना स्थान नाही. हे गद्दारीने तयार झालेले सरकार आहे, हे लवकरच कोसळणार असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.
 
महाराष्ट्राचे पावसाळी अधिवेशन सामूहिक राष्ट्रगीताने सुरु झाले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव संपूर्ण सभागृहाकडून जाहीर केला.
 
अधिवेशनाच्या सुरुवातीलाच काँग्रेस नेते नाना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या ओला दुष्काळावर कटाक्ष टाकला. पावसाने गावं पाण्याखाली गेली आहेत. त्यावर बोलण्याची विंनती त्यांनी अध्यक्षांना केली.
 
यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना म्हंटले, कि सगळ्या परिस्थितीवर सरकार लक्ष ठेवून आहे. त्यावर बैठक देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. त्यावर सरकार पावले उचलत आहेत. त्यावर लवकरच सरकार निर्णय घेईल.