गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 25 सप्टेंबर 2021 (12:33 IST)

Maharashtra Rain: रविवारपासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात वादळी पाऊस पडून चक्रीवादळाचा धोका वाढेल

रविवारपासून पुन्हा मुंबई समवेत महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे पुढील 12 तासात हे चक्रीवादळाचे रूप घेणार.या मुळे विदर्भ,मराठवाडा मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.याचा परिणाम कोंकण आणि मुंबईत दिसणार.पावसाचा हा जोर 26 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर पर्यंत असणार.
 
हवामान खात्याच्या मतानुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र होण्याची दाट शक्यता आहे.येत्या 12 तासात हे चक्रीवादळाचा रूप घेऊ शकतो.येत्या 24 तासात हे ओडिशाच्या किनारपट्टीकडे वाटचाल करेल.याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात दिसेल.
 
येत्या 4 -5 दिवस मेघगर्जनेसह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.विशेषत:रविवारपासून पावसाचा जोर वाढेल. 
 
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याचा परिणाम महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये दिसणार आहे. हे उत्तर आणि उत्तर-पश्चिम दिशेने जाणार आहे. यामुळे रविवारपासून महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.यामुळे,काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल तर काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस होईल. त्याचा परिणाम विदर्भ,मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात जास्तीत जास्त असेल. त्याचा परिणाम कोकण आणि मुंबईतही दिसून येईल.अशी शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे.