मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 19 एप्रिल 2024 (08:59 IST)

महिंद्रा स्कॉर्पिओचा भीषण अपघात, २ ठार तर ३ गंभीर जखमी

नाशिक : नागपूर-मुंबई हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गावर गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास सिन्नर तालुक्यातील खंबाळे शिवारात महिंद्रा स्कॉर्पिओचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातमध्ये दोन ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
 
बाजीराव एकनाथ गांगुर्डे हे जागीच ठार झाले असून निशा रामकिसन गडगूळ (२०) हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगरकडून नाशिककडे जाणाऱ्या महिंद्रा स्कॉर्पिओ वाहनावरील (क्र.एमएच २० -जीटी ००९१) वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या साईड बॅरियरला तोडून दोन्ही लेनच्या मधोमध असलेल्या चारीमध्ये जाऊन पलटी झाली.
 
वाहनचालक परमेश्वर पुंडलिक गडगूळ (२१) मिनाबाई रामकिसन गडगूळ (४६, सर्व रा. करवड ता. जि.संभाजीनगर) गंभीर जखमी झाले आहेत. वावी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. जखमींना समृद्धी महामार्गाकडील रुग्णवाहिकेने औषधोपचारांसाठी सिन्नर व नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. अपघातग्रस्त वाहन मुख्य रस्त्याच्या बाजूला असल्याने वाहतूक सुरळीत सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Edited By - Ratnadeep Ranshoor