शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 सप्टेंबर 2023 (18:35 IST)

Malegaon :यंत्रात साडी अडकून महिला ठार

Malegaon:मालेगावात स्वतःच्या कारखान्यांत यंत्रमागांत साडी अडकून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नाशिकच्या मालेगावात बडा कब्रस्तान समोर एका कारखान्यात पावरलूमच्या तराशण यंत्रात काम करताना महिले पदर यंत्र मागात अडकून महिलेचा मृत्यू झाला. सादिया इसाक अहमद असे या महिलेचे नाव आहे. यंत्रमागासाठी धागा भरण्याचा तराशण यंत्रावर गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजेच्या सुमारास काम करत असताना तिच्या साडीचा पदर मशीन मध्ये अडकून त्या गंभीर जखमी झाल्या त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वी त्यांचे निधन झाले. 
 
मालेगावात यंत्रमाग हा प्रमुख व्यवसाय आहे. या कारखान्यांत गरजू महिलांच्या उदरनिर्वाह साठी  महिला तराशण भरण्याचा कामासाठी आहे. तराशण पट्ट्यात महिलांचा ओढणी आणि साडीचा पदर अडकून महिला गंभीर जखमी होतात. किंवा अपघाताला बळी पडतात. स्वतःच्याकारखान्यांत अपघात होऊन  सादिया इसाक अहमद यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनेची नोंद करून तपास सुरु केला आहे.  

Edited by - Priya Dixit