मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 21 मार्च 2022 (21:24 IST)

मलिक यांना दिलासा नाही, कोठडीतील मुक्काम पुन्हा वाढला

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणी सुटण्याची चिन्हे नाहीत. त्यांना आजही न्यायालयातून दिलासा मिळला नाही. मलिक यांची पोलिस कोठडी 4 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) ED यांना २३ फेब्रवारी रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा कोठडीतील मुक्काम वाढत चालला आहे. दुसरीकडे त्यांच्या राजीनाम्यावरून भाजपने वातावरण पेटवले होते. त्यानंतर मलिक यांच्यांकडील खाती काढुन घेण्यात आली असून त्यांना बिनखात्याचे मंत्री करण्यात आले आहे.
 
नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होती. त्यांना जामीन नाकारला असून आता 4 एप्रिलपर्यंत जरी कोठडीत रहावे लागणार असले, तरी त्यांची बेड वापरण्याची मागणी मान्य करण्यात आली आहे. त्यांच्या पाठदुखीच्या त्रासामुळे त्यांना ही परवानगी देण्यात आली आहे. मात्र मलिकांनी केलेला जामिनासाठीचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम यांच्याशी निगडीत आर्थिक व्यवहार प्रकरणी त्यांना अटक करण्यात आहे. तर त्यांच्या बहीणीशी जमीन व्यवहार आदीबाबत नवाब मलिकांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर नवाब मलिक आधी ईडी कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडीत होते. त्यांची अटक चुकीची असल्याचा दावा खोटा आहे. असे मुंबई उच्च न्यायालयाने सांगितले होते.