बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 6 जुलै 2021 (09:36 IST)

आघाडी सरकारचे अनेक आमदार आमच्या संपर्कात - नारायण राणे

'12 जणांचं निलंबन करण्यात आलं असलं तरी आघाडी सरकारचे अनेक आमदार आमच्या संपर्कात' असल्याचं भाजप नेते नारायण राणेंनी म्हटलंय.
 
"अधिवेशनाच्या आधी मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद ध्यायची असते पण ते पळून गेले, त्यांना कोणतंही गांर्भीय नाही म्हणून त्यांनी दोन दिवसांचं अधिवेशन ठेवलं.एकीकडे स्वतःला वाघ म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूने कोल्ह्यासारखा पळ काढायचा," अशा शब्दांत नारायण राणेंनी टीका केलीय.
 
"कोरोनामुळे 1 लाख 30 हजार लोक मृत्युमुखी पडले,पण तरीदेखील त्याची गांभीर्याने चर्चा झाली नाही.मुख्यमंत्रीही यावर गंभीर नाहीत. इतकंच काय आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांचे पैसेही अजून दिलेले नाहीत.असा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या इतिहासात झाला नाही. जो कॅबिनेटला जात नाही, ना अधिवेशन घेत. आणि असा मुख्यमंत्री शरद पवारांना चालतो?" असा सवाल नारायण राणेंनी केलाय.