शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 23 जून 2018 (10:41 IST)

विवाहितेचा छ्ळ, तीन न्यायाधीशांवर गुन्हा दाखल

नांदेडमध्ये हुंड्यासाठी विवाहितेचा छ्ळ केल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील तीन न्यायाधीशांसह सात जणांविरोधात नांदेडमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
 
शेख वसिम अक्रम (२८ ) या न्यायाधीशाचा मुंबई येथील तरुणीशी डिसेंबर 2016 मध्ये विवाह झाला. सासरच्यांनी 15 लाख रुपये हुंडा मागितला.गुन्हा दाखल होताच सर्व सात जणही फरार झाले आहेत.
 
लग्नापूर्वी आणि नंतरही न्यायाधीश पती शेख वसिम अक्रम, न्यायाधीश दीर शेख अमीर, न्यायाधीश नंदवई शेख जावेद सिद्दिकीसह सासू, सासऱ्यांनी हुंड्यासाठी विवाहितेचा छ्ळ सुरु केला. लग्नापूर्वी मुलाने कार घेण्यासाठी साडेतीन लाख रुपये घेतले. त्यानंतर हुंड्याच्या साडे अकरा लाख रुपयांसाठी अनेक वेळा मारहाण करण्यात आल्याचा आरोप विवाहितेने केला. पैसे न दिल्याने मारहाण करुन घरात कोंबून ठेवण्यात आल्याचाही आरोप आहे.

अंगावरचे आठ लाख रुपयांचे दागिने काढून घेण्यात आले. शिवाय दोन दिरांनी विनयभंग केल्याचं पीडितेने तक्रारीत म्हटलं आहे. पीडितेच्या तक्रारीवरुन इतवारा पोलिसांनी हुंड्यासाठी छळ करणे, मारहाण करणे, बळजबरी दागिने हिसकावणे, आणि विनयभंग या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.