रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 एप्रिल 2020 (16:42 IST)

'हे' भयंकर आहे, वाचा म्हणून तिने दोन मुलासह केली आत्महत्या

सांगलीमधील जत तालुक्यात पतीने माहेरी सोडण्यास नकार दिल्याने महिलेने आत्महत्या केली आहे. जत तालुक्यातील नवाळवाडी येथे राहणाऱ्या बेबीजान इब्राहिम नदाफ यांना आपल्या माहेरी जाण्याची इच्छा होती. पती इब्राहिम नदाफ यांच्याकडे त्या वारंवार माहेरी सोडण्याची मागणी करत होत्या. कर्नाटकातील विजापूर येथे त्यांचे माहेर आहे. लॉकडाउन असल्याने प्रवास करणं शक्य नसल्याने पती इब्राहिम नदाफ यांनी आपण नंतर जाऊ असं सांगितलं होतं. पण यामुळे दोघांमध्ये भांडण झालं.
 
पती माहेरी सोडत नसल्याने बेबीजान नदाफ नाराज झाल्या होत्या. पती शेतामध्ये गेल्यानंतर बेबीजान इब्राहिम नदाफ यांनी आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. एका मुलाचं वय पाच तर दुसऱ्याचं तीन वर्ष होतं. आत्महत्येची माहिती मिळताच गावात खळबळ उडाली आहे.