महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून स्पर्धा परीक्षांनंतर होणाऱ्या निवड प्रक्रियेत बदल
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांनंतर होणाऱ्या निवड प्रक्रियेत बदल करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. प्रचलित कार्यपद्धती आयोगाने विचार करून बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
आयोगाने जारी केलेल्या निर्णयानुसार, सर्व भरती प्रक्रियेबाबत सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर जारी करण्यात येईल. बहुसंवर्गीय पदांच्या भरती प्रक्रियेकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीच्या आधारे पात्र उमेदरवारांकडून पसंतीक्रम मागवून त्याआधारे अंतिम यादी तयार करण्यात येईल.
बहुसंवर्गीय प्रक्रियेच्या भरती प्रक्रिया वगळता अन्य भरती प्रक्रियांकरीता सर्वसाधारण गुणवत्ता यादीच्या आधारे अंतिम शिफारस करण्यात येईल. निवड प्रक्रियेसंदर्भातील सुधारित कार्यपद्धती सन 2020 व त्यानंतरच्या भरती प्रक्रियांच्या जाहिराती आणि त्यांच्या प्रलंबित निकालांना लागू असेल.