शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 19 ऑक्टोबर 2016 (11:14 IST)

मुंबईसह देशभरात हायअलॅट जारी

मुंबई- मुंबईसह देशातील अतिमहत्त्वाच्या शहरांमध्ये हायअलॅट जारी करण्यात आला आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तय्यबा, हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटना हल्ला करण्‍याच्या तयारीत असल्याची शक्यता गुप्तचर विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे गृहमंत्रालयाकडून हायअलॅट जारी करण्यात आले आहे.
 
भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचा बदला घेण्यासाठी पाक दहशतवादी घातपात घडवण्याचा कट रचत असल्याचे समजते.