गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 22 एप्रिल 2023 (08:28 IST)

नाशिक महानगरपालिकेची अधिकृत संकेतस्थळ हॅक

cyber cell
नाशिक महानगरपालिकेची अधिकृत संकेतस्थळ vulzsec या हॅकर्स किंवा ऑर्गनायझेशनकडून हॅक करण्यात आली आहे. शासकीय संकेतस्थळ हॅक झाल्यामुळे कुठेतरी आयटी विभागाकडून कमतरता राहिली असावी अशी शक्यता सायबर तज्ञांकडून सांगण्यात आले आहे.
 
नाशिक महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईट बाबत पालिका प्रशासन नेहमीच उदासीन असल्याचे दिसून आले आहे. वेळोवेळी नाशिक महानगरपालिकेच्या वेबसाईटवर चुकीच्या गोष्टी पोस्ट होणे, आकडेवारी मध्ये त्रुटी आढळणे, अशा घटना घडतच असतात. आता तर थेट वेबसाईट हॅक झाल्याची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. खरंतर, वेबसाईट ही डिजिटल यंत्रणा असून महानगरपालिकेच्या सर्व्हर मध्ये अनेक महत्त्वपूर्ण दस्ताऐवज डिजिटल स्वरूपात स्टोर केलेल्या असतात. 
 
Edited By - Ratnadeep ranshoor