शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 नोव्हेंबर 2021 (08:36 IST)

आरपीआय महिला पदाधिकारी पूजा आंबेकरची हत्या, 20 ते 25 वेळा चाकूचे जीवघेणे वार

दिवाळीत एका महिलेची चाकूने वार करुन हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मृतक महिलेचं नाव पूजा आंबेकर असं असल्याची माहिती समोर आली आहे. पूजा आंबेकर ही  आरपीआय राजकीय पक्षाची  महिला पदाधिकारी होती. रात्रीच्या सुमारास पूजाची हत्या करण्यात आली आहे.
 
20 ते 25 वार करुन निर्घृण हत्या
 
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पूजा आंबेकर या आरपीआयच्या पदाधिकारी होत्या. रात्रीच्या सुमारास संत कबीर नगरमध्ये राहत्या घरात त्यांची हत्या करण्यात आली. ही हत्या इतक्या निर्घृणपणे करण्यात आली की, आरोपीने पूजा आंबेकर यांच्यावर चाकूने तब्बल 20 ते 25 वार केले. सोबत राहणाऱ्या इसमानेच हत्या केली असल्याचा संशय आहे.
 
संबंधित संशयित आरोपी हा अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी शहरात दोन खुनाचे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून गंगापूर पोलीस या संशयित आरोपीचा शोध घेत आहेत. दरम्यान ऐन दिवाळीत झालेल्या या घटनेने संपूर्ण नाशिक जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
 
बुधवारी (दि.३) रात्री ११ वाजेदरम्यान किरकोळ कारणातून दिराने धारदार चाकूने ३० ते ३५ सपासप वार करत भावजयीचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हल्लेखोर दिर फरार झाला असून, पोलीस त्याच्या मागावर आहेत. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
 
पूजा संदिप आंबेकर (वय २७, रा. संत कबीरनगर, महात्मानगर, नाशिक) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. संतोष विष्णू आंबेकर असे फरार दिराचे नाव आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, संतोष आंबेकर याच्यावर दोन खूनाचे गुन्हे दाखल आहेत. तो तुरुंगात शिक्षा भोगत आहे. तो काही दिवसांपूर्वी तुरुंगातून बाहेर आला होता. मृत महिला पूजा आंबेकर पतीपासून काही दिवसांपासून वेगळी राहत होती. दरम्यान, ती दिर संतोष आंबेकरसोबत २० दिवसांपासून खोली भाड्याने घेऊन राहू लागली.बुधवारी रात्री ११ वाजेदरम्यान दोघांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाला. राग अनावर झाल्याने संतोषने पूजावर धारदार चाकूने ३० ते ३५ सपासप वार केले.
 
पोलिसांच्या माहितीनुसार, संतोष आंबेकर याच्यावर दोन खूनाचे गुन्हे दाखल आहेत. तो तुरुंगात शिक्षा भोगत आहे. तो काही दिवसांपूर्वी तुरुंगातून बाहेर आला होता. मृत महिला पूजा आंबेकर पतीपासून काही दिवसांपासून वेगळी राहत होती. दरम्यान, ती दिर संतोष आंबेकरसोबत २० दिवसांपासून खोली भाड्या घेऊन राहू लागली. गुरुवारी रात्री ११ वाजेदरम्यान दोघांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाला. राग अनावर झाल्याने संतोषने पूजावर धारदार चाकूने ३० ते ३५ सपासप वार केले. त्यात ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. त्यानंतर संतोष आंबेकर घटनास्थळावरुन पळून गेला. ही बाब गंगापूर पोलिसांना समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी महिलेला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करत तिला मृत घोषित केले.
 
काही दिवसांपूर्वी वणी येथे महिलेवर सामूहिक बलात्कार
 
नाशिकमधील वणी येथे एका 42 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस घडली होती. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. वणी येथील एसटी बस स्टॅण्ड परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे होती.
 
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित महिला रात्री 11 वाजण्याच्या सुमारास आपल्या मित्रासोबत बस स्थानकात बसली होती. त्यावेळी तेथे आलोल्या चौघांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला. जीवे मारण्याची धमकी देत या महिलेवर आरोपींनी बलात्कार केला असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल आहे.
 
पोलिसांनी या प्रकरणी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. चारही संशयितांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. वणी परिसरात घडलेल्या या घटनेने संपूर्ण नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.