रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 15 ऑक्टोबर 2020 (09:42 IST)

गाडीतील सॅनिटायझरमुळे भीषण आग, NCP नेत्याचा मृत्यू

मुंबई- आग्रा महामार्गावर गाडीला भीषण आग लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रिय नेते संजय चंद्रभान शिंदे यांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना साकोरी फाट्याजवळ मंगळवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास घडल्याचे सांगितले जात आहे.
 
गाडीमध्ये शॉर्टसर्कीटमुळे आग लागली. त्यातच गाडीत असणाऱ्या सॅनिटायझरने पेट घेतल्याचे सांगितले जात आहे. आग लागल्यानंतर गाडीचे दरवाजे जॅम झाल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही. संजय शिंदे हे पिंपळगाव बसंतमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रिय नेते होते.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीने पेट घेतल्यानंतर गर्दी जमली होती परंतू गाडीत अडकलेल्या वयक्तीची कोणाला मदत करता आली नाही. घटनास्थळी अग्नीशामन दलाची गाडी पोहचण्यापर्यंत शिंदे यांचा मृत्यू झाला होता.
 
शिंदे हे जगभर द्राक्ष निर्यातीसाठी प्रसिद्ध असलेल्या साकोरे येथील द्राक्ष निर्यातदार होते. द्रक्ष बागेच्या फवारणीसाठी लागणारी किटकनाशके घेण्यासाठी शिंदे साकोरे येथील निवासस्थानातून पिंपळगावकडे निघाले होते.