सरपंच हत्या प्रकरणात नवीन वळण, संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजयने उच्च न्यायालयातून याचिका मागे घेतली
Sarpanch Santosh Deshmukh murder case : संतोष देशमुख खून प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन खुलासे होत आहे. अशा परिस्थितीत आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. यावेळी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार संतोष देशमुख खून प्रकरणात आता नवा खुलासा समोर आला असून, संतोष देशमुखच्या भावाने न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेतल्याचे माहिती समोर येत आहे. यानंतर त्यांच्याविरोधात दाखल केलेली याचिका मागे घेण्याची कोणती बळजबरी होती, अशी अटकळ बांधली जात आहे. बीड जिल्ह्यातील एका गावातील मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या भावाने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेतली. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचे वकील यांनी ही माहिती दिली. याचिकाकर्ते धनंजय देशमुख यांनी दावा केला होता की, मुंडे हे बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळीच्या म्होरक्याशी संबंधित आहे, ज्यांनीमसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत महत्त्वाची भूमिका बजावली होती. गेल्या महिन्यातच त्यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेत या हत्या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासासाठी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची विनंती केली होती. पण मंगळवारी ही याचिका मागे घेतल्याचे वकिलांनी सांगितले. तत्पूर्वी, संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणात न्याय देण्याची मागणी केली.
Edited By- Dhanashri Naik