बुधवार, 19 फेब्रुवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मनसेला महाआघाडीत स्थान नाही, कॉंग्रेसची भूमिका

काँग्रेसचे मनसेसोबत वैचारिक मतभेद आहेत, त्यामुळे मनसेला महाआघाडीमध्ये स्थान देणे अवघड असल्याची स्पष्ट भूमिका कॉंग्रेसने घेतली आहे. 
 
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली राज्यात आकारास येत असलेल्या महाआघाडीमध्ये मनसेला स्थान मिळणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी यासंदर्भातील आपली भूमिका प्रसारमाध्यमांसमोर मांडली आहे. 
 
काँग्रेस आणि मनसेमध्ये वैचारिक मतभेद आहेत. त्यामुळे अशा पक्षाशी आघाडी करणे अवघड आहे, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.