सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (22:39 IST)

वाढदिवसाला कोणीही माझ्या घरी येऊ नका, अन्यथा..."; राज ठाकरेंचा ऑडिओ मेसेज

raj thackeray
राज ठाकरे यांनी ऑडिओ क्लिपद्वारे कार्यकर्त्यांना एक आवाहन केलं आहे. माझ्या महाराष्ट्र सैनिकांनो पुण्याला माझी सभा झाली, त्यावेळी मी आपल्याला सांगितलं की, माझी शस्त्रक्रिया करायची आहे. मात्र माझ्या टेस्ट झाल्यानंतर कोविडच्या डेड सेलचा संसर्ग झाल्याचं कळलं. त्यामुळे शस्त्रक्रिया रद्द झाली. त्यामुळे आता काही दिवस मी क्वारंटाईन आहे. त्यामध्येच आता माझा वाढदिवस 14 तारखेला आहे. सगळेच भेटायला येतात शुभेच्छा देतात. मलाही त्यामुऴे बरं वाटतं होतो. मात्र यंदा कोणीही माझ्या वाढदिवसानिमित्त घरी भेटीसाठी येऊ नका. कारण मला पुन्हा संसर्ग झाला, तर मला पुन्हा ऑपरेशन पुढे ढकलावं लागेल. असं होऊ नये म्हणून मी कुणालाही भेटणार नाही. आपण आहात तिथेच राहा, मला बरं वाटल्यावर मी निश्चित आपल्याला भेटेल असं राज ठाकरे म्हणाले.