शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 18 जानेवारी 2021 (07:20 IST)

पुन्हा एकदा चिपी विमानतळाचे उद्घाटन लांबणीवर

चिपी विमानतळाचे उद्घाटन लांबणीवर गेले आहे. त्यामुळे कोकणवासियांना पुन्हा प्रतिक्षा करावी लागणार आहे. सिधुदुर्गाच्या चिपी विमानतळाचे उद्घाटन २३ जानेवारी २०२१ रोजी करण्यात येणार होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विमानतळाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. नवनिर्मित चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी बाळासाहेब ठाकरेंच्या जन्म दिनाचे औचित्य साधले होते. परंतु काही कारणास्तव हा उद्घाटन सोहळा लांबणीवर गेला आहे.  
 
या उद्घाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि भाजपचे नेते तसेच माजी मुख्यमंत्री नारायण राणे उपस्थित राहणार होते.  त्यामुळे चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने ठाकरे आणि राणे एकाच मंचावर येणार असल्याने संपूर्ण राज्याचं लक्ष या कार्यक्रमाकडे लागलं होत. 
 
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ हे बहुप्रतिक्षित आहे. या विमानतळामुळे सिंधुदुर्ग आणि आसपाच्या गावांत जाण्यासाठी सोयीची वाहतूक होणार आहे.