शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 26 नोव्हेंबर 2022 (08:13 IST)

आमचे ४० रेडे गुवाहाटीला जातायेत, पण मला जाता येणार नाही- मंत्री गुलाबराव पाटील

Gulabrao Patil
निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेंसह तत्कालीन सरकारमधील ५० आमदार सूरतमार्गे गुवाहाटीला गेले होते. त्यानंतर या राजकीय घडामोडीत गुवाहाटीला विशेष महत्त्व प्राप्त झालं. त्यात मुंबईला येताना शिंदेंसह सगळे आमदार गुवाहाटीतील कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेले होते. त्यावरून बराच वाद निर्माण झाला होता. आता पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह गुवाहाटीला चालले आहेत.
 
या दौऱ्याबाबत बोलताना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, आमच्यातील सगळेच आमदार जात आहे. पण मला जाता येणार नाही. निवडणूक असल्याने मी मुख्यमंत्री शिंदे यांना विनंती केली आहे. ज्यादिवशी आम्ही इकडं येऊ तेव्हा २७ ची रात्र असेल. मग २८ ला आम्हाला मतदारसंघात यावं लागेल. त्यादिवशी माघारी घेण्याचा दिवस आहे. आपला एकतरी प्रतिनिधी असावा यासाठी मी विनंती केलीय. पण निश्चितपणे बाकीचे आमदार जाणार आहेत असं सांगितले. त्यावेळी आमचे ४० रेडे जातायेत. दर्शन घ्यायचं आहे असं अजब विधान त्यांनी केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor