पालघर : 20 आश्रमशाळांतील 250 हून अधिक विद्यार्थी रात्रीचे जेवण करून पडले आजारी
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील सुमारे 20 आश्रमशाळांतील किमान 250 विद्यार्थी मंगळवारी सकाळी संशयास्पद अन्नातून विषबाधा झाल्यामुळे आजारी पडले, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
आश्रम शाळा या आदिवासी विद्यार्थ्यांच्या निवासी शाळा आहेत. पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके म्हणाले की, “एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पच्या डहाणू प्रकल्पांतर्गत असलेल्या विविध आश्रमशाळांमधील 250 हून अधिक विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्या आणि चक्कर आल्याची तक्रार होती, त्यानंतर त्यांना जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्रांमध्ये दाखल करण्यात आले.
त्यापैकी 150 जणांवर अद्याप प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) आणि कासा, तलासरी, वाणगाव, पालघर आणि मनोर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे, तर इतरांना घरी सोडण्यात आले आहे. चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.