मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 1 डिसेंबर 2020 (15:44 IST)

पंकजा मुंडे यांनी स्वत:ला केले आयसोलेट

माजी मंत्री आणि भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची प्रकृती बिघडली असून त्यांनी स्वत:ला आयसोलेट करण्याचा निर्णय घेतला आहे. पंकजा या सध्या मुंबईत असल्याचे समजते.
 
आज पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात मतदान सुरु आहे. त्याच्या आदल्या दिवशीच रात्री पंकजा यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. ''मला सर्दी, खोकला, ताप आहे. यामुळे मी जबाबदारी स्वीकारून आयसोलेट झाले आहे. अर्थाचे अनर्थ करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करावे'', असे आवाहन पंकजा यांनी केले आहे.