शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021 (09:29 IST)

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा पोलिसांच्या ताब्यात

मुक्ताईनगर येथील अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार करणा-या तरुणास एमआयडीसी पोलिसांनी जळगाव शहरातील इच्छादेवी मंदीर परिसरातून ताब्यात घेतले आहे. मुक्ताईनगर येथील एका तरुणाने अल्पवयीन मुलीचे तोंड व हातपाय बांधून तिच्यावर निर्दयीपणे लैंगीक अत्याचार केले होते. अत्याचार केल्यानंतर तो तरुण जळगाव येथे पळून आला होता. तो जळगाव येथे आला असल्याची माहिती मुक्ताईनगर पोलिस स्टेशनचे पो.नि.सुरेश शिंदे यांनी एमआयडीसी पोलिसांना कळवली. त्यानुसार पो.नि. रामकृष्ण पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.कॉ. विजय बाविस्कर, किशोर पाटील, सुधीर साळवे, सचिन पाटील यांच्या पथकाने त्याला शिताफीने शहरातील इच्छादेवी मंदीर परिसरातून ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलीवर निर्दयीपणे लैंगीक अत्याचार करणा-या तरुणाविरुद्ध मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.