गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 नोव्हेंबर 2021 (08:33 IST)

त्रिपुरा हिंसाचार निषेधार्थ, महाराष्ट्रातील या तीन शहरांमध्ये हिंसाचार ,पोलिसांवर दगडफेक, 2 पोलिसकर्मी जखमी

त्रिपुरा हिंसाचाराच्या निषेधार्थ मुस्लिम संघटनांनी आज महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये बंदची घोषणा केली. यादरम्यान अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या बातम्या आल्या आहेत. नांदेडमध्ये हिंसक जमावाने अनेक दुकानांची तोडफोड केली आणि जोरदार दगडफेक केली या  हिंसाचारात अतिरिक्त एसपी, एका निरीक्षकासह 7 जण जखमी झाले आहेत. सरकारी वाहनांचे नुकसान झाले. मालेगावातही बराच गदारोळ झाला. हिंसक जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, सध्या परिसरात शांतता आहे. त्यांनी सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले.
 
भारत बंदच्या आवाहनावरून शुक्रवारी महाराष्ट्रात हिंसाचार वाढला आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये मुस्लिम संघटनांनी बंदची घोषणा केली होती. त्यामुळे नांदेड, मालेगावसह अनेक भागात तोडफोडीच्या घटना घडल्या. अशा स्थितीत जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. या घटनेत दोन पोलीस जखमी झाले आहेत.
 
महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, "परिस्थिती नियंत्रणात आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मी वैयक्तिकरित्या त्यावर लक्ष ठेवत आहे. जर कोणी दोषी आढळले तर त्याला सोडले जाणार नाही. आपण सामाजिक सलोखा राखला पाहिजे." मी सर्वांना आवाहन करतो. मी पोलिसांनाही परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन करतो. संयम आणि शांतता राखा." 
''त्रिपुरातील हिंसाचाराच्या विरोधात आज राज्यभरातील मुस्लिमांनी निषेध मोर्चा काढला. नांदेड, मालेगाव, अमरावती आणि इतर काही ठिकाणी दगडफेक करण्यात आली. मी सर्व हिंदू आणि मुस्लिमांना शांतता राखण्याचे आवाहन करतो," ते म्हणाले.
 
 अमरावतीचे डीसीपी विक्रम साळी म्हणाले की, पाच तक्रारींच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या इथे शांतता आहे. या निषेध मोर्चासाठी पोलिसांची परवानगी घेण्यात आली नाही. तक्रारींच्या आधारे आम्ही संबंधितांवर कठोर कारवाई करू.
 
मालेगावचे एसपी सचिन पाटील यांनी आज सायंकाळी झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी कारवाई केल्याचे सांगितले. मालेगावात सध्या शांतता आहे. नियमित गस्त सुरू झाली आहे. मी लोकांना सांगू इच्छितो की त्यांनी अफवा पसरवणे थांबवावे अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
अलीकडेच बांगलादेशमध्ये दुर्गापूजेदरम्यान अल्पसंख्याक हिंदू समुदायावर हिंसाचार झाल्याच्या बातम्यांनंतर त्रिपुरामध्ये जाळपोळ, लूटमार आणि हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या.